Twitxy Saved

Chetan Vitthal Tupe

@ChetanVTupe

Member of Legislative Assembly, Hadapsar. | अध्यक्ष, मराठी भाषा समिती | Ex. Oppn. Leader, PMC.
Pune, India facebook.com/ChetanTupeNCP/ Joined January 2014
59 Following 10K Followers 6.2K Posts

Latest posts 5

Pinned post

Chetan Vitthal Tupe @ChetanVTupe
अखेर इतिहास घडला.
जनता झाली आमदार.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील माझ्या माय बाप जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आज माझे शब्द अपुरे आहेत. हडपसरचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला हडपसर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी पुनश्च एकदा उपलब्ध करून दिली यासाठी सर्वप्रथम जनतेचे मनापासून आभार मानतो. माझे सहकारी आमदार योगेश अण्णा टिळेकर, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचे, महायुती चे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासून आभार मानतो. या सर्वांनी दिलेली साथ आणि विश्वास माझ्यासाठी मोलाचा आहे.

हडपसर चा विकास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे हा माझा शब्द आहे.

#जनतेचा_आमदार
#इतिहास_घडला
#हडपसर_विधानसभा
#आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे
#महायुती
24 replies 10 reposts 76 likes 4.9K views View on X
Chetan Vitthal Tupe @ChetanVTupe
दसरा अर्थात विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
विजयादशमीचा हा मंगलमय सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, यश, कीर्ती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात बंधुभाव, एकोपा आणि सद्भावना वृद्धिंगत होवोत. राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊन बळीराजाला सुगीचे दिवस लाभोत.
Chetan Vitthal Tupe @ChetanVTupe
‘रयतेला शिक्षण मिळाले पाहिजे’ हा ध्यास घेऊन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीतील दीपस्तंभ होते.त्यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक अभिवादन!
Chetan Vitthal Tupe @ChetanVTupe
आज माझे वडील, माजी खासदार आणि लोकनेते स्व. विठ्ठलराव तुपे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आमच्या निवासस्थानी तसेच साने गुरुजी भवन येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
Chetan Vitthal Tupe @ChetanVTupe
मुंढवा केशवनगर परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थांबरोबर बैठक घेऊन आतापर्यंतच्या कामकाजाची व पाठपुराव्याची माहिती दिली. ग्रामस्थांकडूनच सहकार्य कमी पडत असल्याचे निदर्शनास आणून देऊन ग्रामस्थांना सहकार्य करण्याची विनंती केली.
0:57