Twitxy Saved

Maha Forest Official

@MahaForest

This is the official X handle of Maharashtra Forest Department. Call 1926 - 'Hello Forest' toll free helpline.
Maharashtra, India mahaforest.gov.in Joined October 2015
57 Following 17K Followers 4.4K Posts

Latest posts 5

Maha Forest Official @MahaForest
निसर्गातील प्रेम, निष्ठा आणि सहजीवनाचे प्रतीक — सारस क्रौंच

विदर्भातील पाणथळ जागा, लांब पाय, व तांबड्या रंगाची मान व डोके असणारा हा पक्षी ताडोबा परिसरातील जैवविविधतेतही अत्यंत महत्त्वाचा आहे.

🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर

#पक्षीसप्ताह #सारसक्रौंच #पक्षीसंवर्धन
Maha Forest Official @MahaForest
आकाशातील दुर्मीळ सम्राट — राजगिधाड

काळसर शरीर, लाल रंगाचे उघडे डोके व मान आणि मजबूत चोच असलेला हा अत्यंत मोठा आणि शक्तिशाली पक्षी विदर्भ आणि मध्य भारतातील जंगलात व खुल्या प्रदेशात आढळतो.

🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर

#पक्षीसप्ताह #राजगिधाड #पक्षीसंवर्धन
Maha Forest Official @MahaForest
पांढऱ्या पाठीचे गिधाड

विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर जंगलांमध्ये आढळणारे हे गिधाड मृत प्राण्यांचे मांस खाऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करते. यांच्या कार्यामुळे मृत जनावरांमधून पसरणाऱ्या रोगांचा धोका टळतो.

🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर

#पक्षीसप्ताह
Maha Forest Official @MahaForest
नदीच्या वाळूवर घरटे करणारा आकर्षक पक्षी — पाणाचिरी

मोठ्या नद्या व वाळूच्या पट्ट्यांवर आढळणारा हा काळा-पांढरा आकर्षक पक्षी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे.

🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर

#पक्षीसप्ताह #पाणाचिरी #पक्षीसंवर्धन #IndianSkimmer #MahaForest
0 replies 3 reposts 12 likes 472 views View on X
Maha Forest Official @MahaForest
गवताळ प्रदेशातील निसर्गाचा नर्तक — तणमोर

सोलापूर व दख्खनच्या पठारी भागात आढळणारा हा जगातील सर्वात आकर्षक प्रणयप्रदर्शन करणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे.

🗓️ पक्षी सप्ताह: ५-१२ नोव्हेंबर

#पक्षीसप्ताह #तणमोर #LesserFlorican #BirdWeek