Twitxy Saved

Navi Mumbai Municipal Corporation

Verified account This account is verified. Learn more

@NMMConline

This is the official Twitter account of Navi Mumbai Municipal Corporation (NMMC). Connect us on Facebook: NMMConline
Instagram: nmmconline
Navi Mumbai nmmc.gov.in Joined January 2014
61 Following 31K Followers 9.4K Posts

Latest posts 5

Navi Mumbai Municipal Corporation Verified account @NMMConline
प्रत्येक वस्त्राच्या पुनर्वापरातून शाश्वत विकासाकडे एक पाऊल!

देशातील स्वच्छ शहरांमध्ये #1 बहुमान मिळवण्यात महत्त्वपूर्ण योगदान!

नवी मुंबईच्या स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने राबवण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांपैकी एक म्हणजे ‘पुनःसूत्र’ – वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्र (Textile Recovery Facility - TRF).

वापरानंतर टाकून दिलेले कपडे येथे संकलित केले जातात. त्यांचे वर्गीकरण करून पुनर्प्रक्रिया केली जाते. त्यातून उपयुक्त आणि मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती केली जाते.

या उपक्रमाच्या माध्यमातून —

✔️ वापरानंतरच्या कपड्यांचे संकलन आणि पुनर्प्रक्रिया
✔️ जुन्या कपड्यांपासून मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती
✔️ स्वयंसहाय्यता गटांसाठी रोजगाराच्या संधी
✔️ वस्त्रोद्योग मंत्रालय आणि SBI Foundation यांच्या सहकार्याने चक्रीय मूल्यसाखळीची निर्मिती

नवी मुंबईच्या स्वच्छतेच्या बहुमानामागील आणखी एक महत्त्वपूर्ण योगदान!

(Textile Recovery Facility | Textile Recycling | Circular Economy | Waste to Worth | Resource Conservation | Employment Generation | Sustainable Development)

#SwachhSurvekshan #CleanCityNo1 #TextileRecoveryFacility #TextileRecycling #CircularEconomy #WasteToWorth #ResourceConservation #SustainableDevelopment #MajhiVasundhara #MissionLiFE #Swachhata2026 #SwachhBharatMission #SBMUrban2 #SwachhBharat #SwachhMaharashtra #SwachhMaharashtraMission #ReduceReuseRecycle #UrbanDevelopment #JanSahabhag #SustainableFuture #NaviMumbai #NMMC #MaharashtraDGIPR
Navi Mumbai Municipal Corporation Verified account @NMMConline
प्रत्येक मुलाला समान संधी, सर्वसमावेशक शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सदैव कटिबद्ध!

प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षण मिळावे, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याने आत्मविश्वासाने स्वतःचे भविष्य घडवावे, हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धती, दर्जेदार शैक्षणिक साहित्य, उत्तम शैक्षणिक सुविधा आणि शिक्षणासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिले जाते. कारण, चांगलं शिक्षण हीच उज्ज्वल भविष्याची खरी पायाभरणी!

#NMMC #NaviMumbai #QualityEducation #InclusiveEducation #EducationForAll #BrightFuture
Navi Mumbai Municipal Corporation Verified account @NMMConline
पावसाचा प्रत्येक थेंब जपूया, जलसंवर्धनाचा आदर्श घडवूया!

पाण्याचे संवर्धन ही केवळ काळाची गरज नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. याच विचारातून नेरूळ पूर्व, नवी मुंबई येथील अलकनंदा सोसायटीमध्ये गेल्या १५ वर्षांपासून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे.

सोसायटीमध्ये गेल्या २५ वर्षांपासून बोअरवेल कार्यरत असून, गेल्या १५ वर्षांपासून पावसाच्या पाण्याद्वारे तिचे पुनर्भरण (Borewell Recharge) केले जात आहे.

या उपक्रमांतर्गत:

✔️ इमारतीच्या टेरेसवर जमा होणारे पावसाचे पाणी वाहिन्यांद्वारे (Channels) बोअरवेलपर्यंत पोहोचवले जाते.

✔️ फिल्टर यंत्रणेच्या साहाय्याने पाणी गाळून बोअरवेलमध्ये सोडले जाते.

✔️ या प्रक्रियेमुळे भूजल पुनर्भरणास (Groundwater Recharge) मदत होते.

✔️ पुनर्भरण झालेल्या बोअरवेलमधील पाण्याचा वापर वर्षभर सोसायटीतील उद्यानाच्या देखभालीसाठी केला जातो.

✔️ त्यामुळे उद्यानासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज स्थानिक पातळीवर भागवण्यास मदत होते.

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि वाढती पाणीटंचाई लक्षात घेता, पावसाच्या पाण्याचे संकलन (Rainwater Harvesting), भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा योग्य पुनर्वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

अलकनंदा सोसायटीचे सेक्रेटरी श्री. प्रवीण बरवे यांचे इतर सोसायट्यांना आवाहन आहे की, प्रत्येक सोसायटीने आपल्या परिसरात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम राबवून जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा.

जलसंवर्धन हे केवळ शासनाचे कर्तव्य नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हे देशहिताचे कार्य समजून प्रत्येकाने आपले योगदान द्यावे!

चला, पावसाचा प्रत्येक थेंब जपूया आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करूया!

[Water Conservation, Rainwater Harvesting, Borewell Recharge, Groundwater Recharge, Water Reuse, Sustainable Water Management, Rainwater Management, Responsible Citizenship, Community Participation.]

#WaterConservation #RainwaterHarvesting #BorewellRecharge #GroundwaterRecharge #WaterReuse #SaveWater #WaterManagement #SustainableWaterManagement #MissionLiFE #MajhiVasundhara #Swachhata2026 #SwachhBharatMission #SBMUrban2 #SwachhBharat #SwachhMaharashtra #SwachhMaharashtraMission #ReduceReuseRecycle #UrbanDevelopment #JanSahabhag #SustainableFuture #NaviMumbai #NMMC #MaharashtraDGIPR
1:18
Navi Mumbai Municipal Corporation Verified account @NMMConline
ज्ञानातून घडते व्यक्तिमत्त्व, कर्तृत्वातून घडते राष्ट्र!

प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नात उद्याच्या नव्या संधी दडलेल्या आहेत आणि त्यांच्या ज्ञानात समाज परिवर्तनाची ताकद आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करत त्यांच्या कल्पकतेला, जिद्दीला आणि कर्तृत्वाला योग्य संधी देऊया.

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देत ज्ञानसमृद्ध, सक्षम आणि प्रगत राष्ट्राच्या उभारणीत योगदान देऊया!

१७ नोव्हेंबर | आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(Student Empowerment | Education for All | Knowledge and Innovation | Youth Development | Nation Building)

#InternationalStudentsDay #StudentEmpowerment #EducationForAll #MajhiVasundhara #MissionLiFE #Swachhata2026 #SwachhBharatMission #SBMUrban2 #SwachhBharat #SwachhMaharashtra #SwachhMaharashtraMission #ReduceReuseRecycle #UrbanDevelopment #JanSahabhag #SustainableFuture #NaviMumbai #NMMC #MaharashtraDGIPR