Twitxy Saved

Anil Shidore अनिल शिदोरे

Verified account This account is verified. Learn more

@anilshidore

नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना mnsblueprint.org, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI maitripune.net
Pune, Maharashtra anil-shidore.blogspot.in Joined November 2009
98 Following 61K Followers 20K Posts

Latest posts 5

Anil Shidore अनिल शिदोरे Verified account @anilshidore
दुष्काळात मायक्रो-फायनान्स करणाऱ्या कंपन्या आणि खाजगी सावकारांवर राज्याच्या गृहमंत्रालयानं विशेष नजर ठेवली पाहिजे. भीषण परिस्थितीतही अव्वाच्या सव्वा व्याज आकारणं ही मंडळी चालूच ठेवतात. अक्षरश: लुटतात. ह्यातल्या पिळवणुकीविरूध्द आणि बेकायदेशीर व्याज आकारणी विरोधात महाराष्ट्र शासनानं सजग रहावं.

अशा परिस्थितीत महाराष्ट्रानं पूर्वी - फार पूर्वी महात्मा फुल्यांच्या काळात - दंगे झालेले पाहिले आहेत. “दख्खनचे दंगे” (१८७५) ह्या नावाने ते प्रसिध्दही आहेत. त्याची पुनरावृत्ती होऊ नये ह्याची दक्षता घेतली पाहिजे.

#दुष्काळ #महाराष्ट्र
1 replies 13 reposts 72 likes 1.5K views View on X
Anil Shidore अनिल शिदोरे Verified account @anilshidore
बंकर रॅाय काही दिवसांपूर्वी गेले. आम्ही समाजकार्याचं शिक्षण घेताना आमच्या समोर जी उदाहरणं होती त्यात ते एक होते. "विकासाच्या केंद्रस्थानी माणूस हवा" हे त्यांच्याकडून शिकलो. (Putting People First)

काल मंगळवारच्या साप्ताहिक बैठकीत मेळघाटच्या जंगलातल्या पंप्ड स्टोरेज प्रकल्पाची साधक-बाधक चर्चा चालू असताना तर नक्कीच त्यांची आठवण झाली.

#मेळघाट #महाराष्ट्र #विकास
1 replies 4 reposts 26 likes 1.3K views View on X
Anil Shidore अनिल शिदोरे Verified account @anilshidore
एखाद्या रस्त्याचं चित्र इतकं चांगलं चितारावं की वाटावं ताबडतोब आधी त्या रस्त्यावर जाऊन पुन्हा एकदा फेरफटका मारून जुन्या आठवणी जागवाव्यात. त्याचं उदाहरण म्हणजे “पुण्यभूषण” च्या दिवाळी अंकातील माधव गोखल्यांचा लेख.

पुण्यातील एका सुप्रसिध्द रस्त्याचं चित्र. “एम जी रोड नावाचा कोलाज”.

मार्झ -ओ-रीन, क्यॅम्पातल्या बेकऱ्या, त्यातल्या त्यात “नाझ” चा सामोसा, बुधानी. किती किती नावं घ्यायची.. पण, नुसती दुकानं नाहीत तर तिथला इतिहास, पुण्याची सांस्कृतिक विविधता.. उत्तम चित्रण. एखादा कॅमेरा विथ कॅामेन्ट्री. सुंदर.. लेख संपवला आणि निघालो क्यॅम्पात एम. जी. रोडवर..

#दिवाळीअंक #पुणे
1 replies 8 reposts 45 likes 1.9K views View on X
Anil Shidore अनिल शिदोरे Verified account @anilshidore
“कन्नड लोकांचे अधिकार, सन्मान आणि संधी ह्याबाबतीत कर्नाटकात तडजोड नाही. ज्या खाजगी कंपन्यांमध्ये कन्नडिगांवर अन्याय होत असेल त्यांच्याविरूध्द कारवाई केली जाईल” अशा आशयाचं विधान २५ ॲाक्टोबरला कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केलं.

कर्नाटकात IT उद्योग मोठा आहे. तिथे कन्नड लोकांवर अन्याय होत असल्याबाबत समाजमाध्यमावर आवाज उठला. त्याची दखल घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तशा आशयाचं विधान केलं. त्यावर तिथे बरीच चर्चा आणि वादंग सुरू आहे.

महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी नाही.

भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ नुसार भारतातील नागरिकाला सर्वत्र संचार करण्याचा तसेच कुठेही नोकरी, व्यवसाय करायचा अधिकार आहे. कलम १४ प्रमाणे समानतेचाही अधिकार आहे. परंतु, ह्याच कलम १९ मध्ये काही वाजवी, समंजस कारणानं त्यावर सरकार बंधनं (reasonable restrictions असा शब्दप्रयोग आहे) घालू शकतं किंवा त्यात काही विशेष नियम करू शकतं अशीही सोय आहे.

आज रोजगारासाठी विलक्षण स्पर्धा आहे. आयटी सारख्या क्षेत्रात आहेच आहे. त्यात पुन्हा AI नी रोजगारावर गदा येणार. त्यात शिवाय भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे रोजगारासाठी महाराष्ट्रातील तरूण-तरुणी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार.

नेमक्या ह्याच वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात सतत नवनवे उद्योग येण्याच्या घोषणा करत आहेत, ही फार आशादायक गोष्ट आहे. महाराष्ट्राची जमीन, पाणी, वीज अशा गोष्टी ह्या खाजगी उद्योगात वापरल्या जाणार, मग त्या परिस्थितीत वाजवी कारणानं (reasonable) कलम १९ मध्येच बसवून

“महाराष्ट्रात निर्माण होणारा प्रत्येक रोजगार मराठी मुला-मुलींनाच मिळेल, किमान तीन वेळा जाहिरात देऊनही त्या शैक्षणिक आणि गुणवत्तेचा उमेदवार मिळाला नाही तरच विशेष बाब म्हणून परप्रांतांमधील लायक उमेदवारांना संधी मिळेल” अशा प्रकारचा राज्याचा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात तातडीची बाब म्हणून करता येणार नाही का? @CMOMaharashtra

#रोजगार #स्थानिकांनारोजगार #महाराष्ट्र