Twitxy Saved

Mayuresh Konnur

Verified account This account is verified. Learn more

@kmayuresh

Journalist. Travel. Music. Literature. History. Theatre. Films. Views strictly personal. #सर्वव्यापीआंबेडकर
Mumbai, India youtube.com/playlist?list=… Joined January 2010
544 Following 11K Followers 3.2K Posts

Latest posts 5

Mayuresh Konnur Verified account @kmayuresh
दिवाळी अंकात लिहायची बऱ्याच वर्षांची इच्छा यंदा पूर्ण झाली.

पहिला अंक ‘क्रिककथा’. कौस्तुभ चाटे हा माझा चुलत भाऊ. मी त्याला आदरार्थी वर्गात मानतो. क्रिकेट त्याचं वेड होतं, आहे. खरं तर मला ते फार उशीरा समजलं. त्यानं कोविडकाळात क्रिकेट व्लॅाग्स सुरू केले तेव्हा. सहा वर्षांपूर्वी त्यानं पूर्णपणे क्रिकेटला वाहिलेला ‘क्रिककथा’ हा दिवाळी अंक सुरू केला. मग नोकरी वगैरे सगळं सोडून क्रिकेटच्या त्याच्या वेडाला पूर्णवेळ वाहून घेतलं. एकटा दिवाळी अंकाचा गोवर्धन उचलत उभा असतो दरवर्षी. ‘पॅशन’ हाच एकमेव शब्द त्याला योग्य. यंदा तर तो हा अंक इंग्रजीतही प्रकाशित करतोय. मी त्याला दोन-तीन वर्षांपासून म्हणत होतो की मी तुझ्या अंकात लिहितो म्हणून. यंदा मुहूर्त लागला. आणि पहिल्यांदा क्रिकेटवर काही गंभीरपणे लिहिलंय. साहेबांचा हा खेळ या देशात ‘क्रिकेटधर्म’ वगैरे होण्यासाठी संस्थानिकांनी दिलेला राजाश्रय हा एक महत्वाचा टप्पा भारतीय क्रिकेटच्या प्रवासात आला. त्याविषयी लिहिलंय. ‘क्रिककथा’ नक्की वाचा.

दुसरा अंक ‘अनुभव’. सुहास कुलकर्णी आणि गौरी कानिटकर यांनी सुचवलं की देवदत्त पट्टनायकांची मुलाखत करूया. पट्टनायकांशी काही वर्षांपूर्वी ‘माझा कट्ट्यावर’ ओळख झाली होती. पण त्यानंतरच्या काळात त्यांचा लेखनसंभार मोठा विस्तारला. मिथकशास्त्र हा त्यांचा मूळ विषय. पण इतिहास, मानववंशशास्त्र, भाषा अशा सगळ्या संलग्न विषयांत त्यांचा मुक्त संचार. मुख्य म्हणजे भूमिका घेण्यात कचरत नाहीत. स्पष्ट बोलतात. त्यांची काही मांडणी न पटणारीही असू शकते. पण त्याविषयी चर्चा होऊ शकते. मला वाटतं संशोधक-अभ्यासक न सापडलेली उत्तरं शोधत असतात. पण ती शोधण्यासोबतच जर त्यांच्या मांडणीनं भवतालातल्या पूर्वग्रह-समजुतींना धक्का बसला, काही नवीन प्रश्न आपल्याला पडले, विचारमंथन झालं तर संशोधनाचा एक महत्वाचा हेतू पूर्ण झाला असं म्हणावं लागेल. मला वाटतं देवदत्त अशा मंथनाला महत्व देणाऱ्या समकालीन लेखक-संशोधकांपैकी एक आहेत. दोन-अडीच तास त्यांच्या मुंबईतल्या घरी सलग चर्चा झाली. ती ही मुलाखत. जेव्हा मिथकं आणि इतिहासाचं मिश्रण करून त्यावर जाणीवपूर्वक राजकारण रचलं जातं आहे आणि त्याला उलट प्रश्न न विचारता बहुतांश लोक त्या राजकारणाचे बळी होताहेत, तेव्हा पट्टनायकांनी या मुलाखतीत घेतलेली भूमिका अत्यावश्यक ठरते. त्यामुळे ‘अनुभव’चा यंदाचा रौप्यमहोत्सवी अंक नक्की घेऊन वाचा.

या दोन अंकांसोबतच वैचारिक घुसळण आणि समृद्धी असं दोन्ही देणारे अनेक अंक यंदाही आले आहेत. भरपूर वाचूया. सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा!

#HappyDiwali
Mayuresh Konnur Verified account @kmayuresh
यंदाच्या ‘अनुभव’च्या दिवाळी अंकात देवदत्त पट्टनायक @devduttmyth यांची मुलाखत न चुकवता वाचण्यासारखी…!
📖 यंदाच्या 'अनुभव' दिवाळी अंकात वाचा 📖

इतिहास, मिथक आणि राजकारणाचा गुंता समजून सांगणारी अभ्यासपूर्ण मुलाखत

मिथक आणि इतिहास यांची गल्लत केली तर दिशाभूल निश्चित!

मुलाखत - देवदत्त पटनायक
संवादक - मयुरेश कोण्णूर

• 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 84849 88258
View quoted post on X
1 replies 3 reposts 11 likes 806 views View on X
Mayuresh Konnur Verified account @kmayuresh
मानसिक स्वास्थ्य #MentalHealth हा अद्यापही निवडकांपर्यंत पोहोचलेला विषय. पण ज्या बदलत्या जगात आपण प्रवेश करतो आहोत, त्यात पूर्वी कधीही नव्हती तेवढा तो प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.

ज्यांनी हा विषय मराठी जनांपर्यंत नेण्यासाठी बोलून, लिहून, संस्थात्मक काम उभारून हयातभर प्रयत्न केले त्या डॅा. आनंद नाडकर्णींचं अलिकडेच निधन झालं.

त्यांना ट्रिब्यूट म्हणून यंदाच्या ‘अक्षर’च्या दिवाळी अंकात मानसिक स्वास्थ्यावर एक विशेष लेखमाला आहे. तिचं संपादन तेजस्विनीनं @DrTejaswiniK केलं आहे.

बदलत्या जगाचे काय परिणाम आपल्या मनावर होताहेत आणि त्यासाठी जगभर कोणते नवे उपाय, संशोधन केलं जातं आहे, याबद्दल आणि इतरही अनेक आयामांबद्दल वाचायला मिळेल. आपल्या मनाबद्दल नव्यानं अनेक गोष्टी समजतील.

शिवाय नेहमीप्रमाणे अंकात विविध वाचनीय लेख आहेतच. नक्की घ्या आणि वाचा!

दिवाळीच्या शुभेच्छा!
Mayuresh Konnur Verified account @kmayuresh
As it looks, the SIR protests and politics around it will continue for sometime. But let’s not get distracted by the mere noise of it. The focus should not go away from key questions:

1. How and why crores of names were removed from voters list across the country? Were ‘logical discrepancies’ credible?
2. What about the loss of fundamental right of those voters who later won their appeals, but only after elections were over?
3. What about the disagreements by the two ECs raised by writing letters officially, as The Indian Express reported? Were the SIR related decisions taken unilaterally?
4. Was the control of the ECI’s centralised online platform for voter data update was restricted to few in Delhi? Is it now accessible to the EROs?
5. Were the contents of form 6 (new voter registration) changed/added without approval from the parliament/govt/SC? Who did that and why?
6. Is the real intent behind SIR being achieved?
7. Is the credibility of this important autonomous institution hit? How responsibility can be fixed? Is CEC being shielded?