Twitxy Saved

PMC Care

@pmccarepune

पुणे महानगरपालिकेच्या पीएमसी केअर प्रकल्पाचे अधिकृत ट्विटर खाते
The official Twitter account of Pune Municipal Corporation's PMC CARE Platform.
Pune pmccare.in Joined March 2023
141 Following 1.2K Followers 8.6K Posts

Latest posts 5

PMC Care @pmccarepune
खिडकी उघडा हवेसाठी, कचऱ्यासाठी नाही!

आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वाहनातून प्रवास करताना रस्त्यावर कचरा, प्लास्टिक किंवा खाद्यपदार्थांची पाकिटे फेकू नका. स्वच्छतेची सवय लावा, पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावा!
PMC Care @pmccarepune
जागतिक मत्स्यव्यवसाय दिन
PMC Care Verified account @PMCPune 2h
जागतिक मत्स्यव्यवसाय दिन

दरवर्षी २१ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मत्स्यव्यवसाय दिन म्हणून साजरा केला जातो. मत्स्यव्यवसायाचे अन्नसुरक्षा, पोषण, रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जगभरातील कोट्यवधी लोकांची उपजीविका मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालनावर अवलंबून आहे. मत्स्यसंपत्तीचे संवर्धन, जलपरिसंस्थांचे संरक्षण आणि शाश्वत मासेमारी पद्धतींचा अवलंब करण्याबाबत जनजागृती करणे या दिवसाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. मत्स्यव्यवसायाशी संबंधित मच्छीमार आणि त्यांच्या समुदायांच्या हक्कांचे व उपजीविकेचे संरक्षण करण्याचा संदेशही या दिनानिमित्त दिला जातो.

नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE

#WorldFisheriesDay #WorldFisheriesDay2026 #FisheriesDay #SustainableFishing #SustainableFisheries #Aquaculture #FisheriesDevelopment #FoodSecurity #Nutrition #LivelihoodSupport #FishermenCommunity #MarineConservation #WaterEcosystem #FisheriesConservation #SaveAquaticLife

@FisheriesGoI
View quoted post on X
PMC Care @pmccarepune
स्वतःच्या मनाने औषधांचे प्रमाण कमी-जास्त करणे टाळा.

जागतिक AMR जनजागृती सप्ताह २०२६

१८ ते २४ नोव्हेंबर २०२६

नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE

@MoHFW_INDIA
PMC Care @pmccarepune
अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी महापालिकेची धडक कारवाई सुरूच!
PMC Care Verified account @PMCPune 20h
अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी महापालिकेची धडक कारवाई सुरूच!

शहरातील सार्वजनिक जागांचा सुयोग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी तसेच रस्ते, पदपथ आणि वाहतुकीचे मार्ग अडथळामुक्त ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत अनधिकृत अतिक्रमणे आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून संबंधित भागांमध्ये पाहणी करून अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे, सार्वजनिक जागा मोकळ्या करणे आणि शहरातील नागरी शिस्त व सुव्यवस्था राखण्यावर भर देण्यात येत आहे.

कारवाई करण्यात आलेली क्षेत्रीय कार्यालये :
1. छत्रपती शिवाजीनगर – घोले रोड
2. वानवडी
3. वारजे – कर्वेनगर
4. औंध – बाणेर
5. कोंढवा – उंड्री
स्वच्छ, सुरक्षित, सुव्यवस्थित आणि अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी पुणे महानगरपालिकेची ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.

नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE

#pmccare #EncroachmentFreePune #EncroachmentAction #CivicDiscipline #PublicSpaces #CleanPune #BetterPune
View quoted post on X
PMC Care @pmccarepune
पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत अतिक्रमणे आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात नियमित कारवाई करण्यात येत आहे.
0:30