पिंपरी-चिंचवड : लहान मुलांना पळवून नेणाऱ्या संशयावरून मोशीतील शिवाजीवाडी परिसरात दोन मूकबधिर व्यक्तींना स्थानिक नागरिकांनी पकडून दोरीने बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात दोन्ही व्यक्ती केवळ सोसायटीमध्ये डोनेशन मागण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले. मुलांना पळवून नेण्याचा किंवा अन्य कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे आढळले नाही. या घटनेत दोघांना मारहाण केल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 नोव्हेंबर रोजी मोशी मार्शल यांना डायल 112 वर कॉल प्राप्त झाला. मोशी गावच्या हद्दीतील शिवाजीवाडी येथे दोन व्यक्तींना स्थानिक नागरिकांनी पकडून ठेवले असून, ते लहान मुलांना पळवून नेत असल्याचा संशय असल्याचे कॉलरने सांगितले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी महामार्गालगत दोन व्यक्तींना पळून जाऊ नये म्हणून दो�

0:20