Twitxy Saved

Sumedh

@sumedhara

अत्ता हि अत्तनो नाथो, अत्ता हि अत्तनो गति.

परमसौगत☸️☸️
Deccan⛰️ Joined July 2016
1.3K Following 339 Followers 25K Posts

Latest posts 5

Sumedh @sumedhara
Marathi literature is quite mediocre
पु.ल. देशपांडे हे अतिशय विद्वान्,चतुरस्र, हजरजबाबी लेखक होते.
त्यांना भारतीय संगीताची अद्भुत समज होती. ज्यामुळे अनेक थोर गायक त्यानी प्रसिद्धिला आणले.मात्र मला लेखक म्हणून ते कधीच आवडले नाहीत.
ते वाचकांचा अनुनय करणारे लेखक होते.
त्यापायी त्यानी अतिशय भुक्कड़ व कोटिबाज लोकानुनयी प्रवासवर्णनं लिहिली. त्यांचे लेखन कालबाह्य होणारच होते.तसे ते झाले.
त्यांची नाटकीय सफर ही प्रयोगशील व अस्सल मातीतली नव्हती पण त्यांच्या नावाने तिला वलय प्राप्त झाले. जे स्वाभाविक होते..बाकी लाडकं व्यक्तिमत्व वैगरे मराठी माणसांचे शब्दबंबाळ भ्रामक बुडबुडे आहेत. त्यांना नवनवीन देव लागतात!तरीही त्यांचे एक लोकप्रियतेचे व दातृत्वाचे युग होते ज्याचे महाराष्ट्रावर अपार ऋण आहेत…त्याला नमन…अजातशत्रु राहाण्याच्या मोहापायी आणिबाणी वगळता त्यानी कायमच टोकदार भूमिका न घेता लोकानुनयी भूमिका घेतली.
लोकानीही बदल्यात त्यांच्यावर भरभरुन प्रेम केलं.
त्यांचं साहित्य हे अभिजात नव्हेच.
पण लोकप्रियतेच्या कसोटीला उतरणारं होतं.
त्यांचे स्मरण आहेच.
त्यांना प्रेमाचा प्रणाम…ता.क.1
Mediocre , ज्यानी आतुन रक्तबंबाळ करणारं अनुभवलं, पाहिलं, वाचलं नाही. जगात फिरुन जगाचा गाभा शोधला नाही असे वरवरचे लोक मला अत्यंत humiliate करणारं लिहितील मला शिव्या घालतील हे गृहीत आहे. मी कुणालाच उत्तर देणार नाही.
चिरंतन आणि नश्वर यात भेद करण्याची माझी कक्षा वेगळी आहे. आपण भड़ास काढू शकता.
बाकी काळ बलवान आहे!ता.क.2
प्रतिक्रिया मनोरंजक आहेत. माझं मत 200% ठाम आहे. पु.ल. त्यांच्या काळातले उत्तम नेटवर्कर,लॉबीस्ट व पब्लिक रिलेशन मास्टर होते. व्यवहार सुनितबाई कठोरपणे चोख पहात. मखर, देव्हारा, देव तयार झाला. अनेक समकालिन जीनियस लेखक ही व्यवस्था नसल्याने टाचा घासत अस्त पावले…ता.क.3खरं अभिजात विनोदी लेखन वाचयचं असेल तर जी.ए.कुलकर्णी यांचं “माणसं:अरभाट आणि चिल्लर” हे परचुरे प्रकाशन प्रकाशित पुस्तक वाचा.👍ता.क.4एव्हढे करोड़ लोकं मानतात म्हणुन बरोबर आहे हे मानणाऱ्यातला मी नाही.
~राजू परूळेकर©
View quoted post on X