Twitxy Saved

माझी Mumbai, आपली BMC

Verified account This account is verified. Learn more

@mybmc

Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.
Mumbai, India portal.mcgm.gov.in Joined February 2013
105 Following 1M Followers 108K Posts

Latest posts 5

माझी Mumbai, आपली BMC Verified account @mybmc
🔷शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत रॉकेट व तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत आहे.

🔷नागरिकांनी नियमांचे आणि निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

#Mybmcupdates

@CPCB_OFFICIAL
@mpcb_official
@EnvironmentMaha
@mybmcSWM
@MumbaiPolice
123 replies 135 reposts 276 likes 42K views View on X
माझी Mumbai, आपली BMC Verified account @mybmc
🔷दिवाळी साजरी करताना, फटाके फोडताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे - मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांचे विनम्र आवाहन

#Diwali
1:49
120 replies 50 reposts 155 likes 24K views View on X
माझी Mumbai, आपली BMC Verified account @mybmc
🔷गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) खालून बांधण्यात येणाऱ्या दुहेरी भूमिगत बोगद्याच्या कामात महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात यश आले आहे. या दुहेरी बोगद्यांपैकी पहिल्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या ‘तुळशी’ या बोगदा खनन यंत्राद्वारे (Tunnel Boring Machine –TBM) आतापर्यंत २७० मीटर लांबीचे खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी सज्ज असलेल्या ‘विहार’ या दुसऱ्या बोगदा खनन यंत्राद्वारे शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष खोदकामास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील दोन्ही बोगद्यांच्या निर्मितीच्या कामाला आता गती प्राप्त झाली आहे.

🔷गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (TBM) तंत्रज्ञानाद्वारे ५.३४ किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत.

🔷यापैकी पहिल्या बोगदा खणन सयंत्राचे नामकरण 'तुळशी' आणि दुसऱ्या बोगदा खणन सयंत्राचे नामकरण ‘विहार’ असे करण्यात आले आहे. संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘तुळशी’ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यानंतर आतापर्यंत गोरेगावकडून मुलुंडच्या दिशेने २७० मीटरपेक्षा अधिक लांबीचे खोदकाम पूर्ण केले आहे.

🔷दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘विहार’ या बोगदा खनन संयंत्राची स्थळ स्वीकृत चाचणी (Site Acceptance Test) नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर , शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ पासून दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामास अधिकृतपणे प्रारंभ करण्यात आला आहे.

🔷‘विहार’ हे दुसरे बोगदा खनन संयंत्र ‘तुळशी’ प्रमाणेच अत्याधुनिक सिंगल शिल्ड अर्थ प्रेशर बॅलन्स (Single Shield Earth Pressure Balance – EPB) तंत्रज्ञानावर आधारित आहे. या संयंत्राच्या कटर हेडचा व्यास १४.४९ मीटर असून संपूर्ण संयंत्राची लांबी ८३ मीटर आहे. यामध्ये २२ मीटर लांबीचा शिल्ड भाग आणि तीन मजली रचनेचा ६१ मीटर लांबीचा बॅकअप गॅन्ट्री विभाग समाविष्ट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे खोदकाम करताना बोगद्याच्या अग्रभागातील मातीचा दाब नियंत्रित ठेवता येतो. परिणामी, जमिनीची स्थिरता राखून सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने बोगद्याचे खोदकाम करणे शक्य होते.

🔷संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

#mybmcupdates

@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
5 replies 42 reposts 227 likes 30K views View on X