Twitxy Saved

Dr Neelam Latika Diwakar Gorhe

Verified account This account is verified. Learn more

@neelamgorhe

नेता शिवसेना व आमदार .माजी उपसभापती,विधानपरिषद,MLC & EX Deputy Chairperson of The Legislative council of Maharashtra,India Hon.President,Stree Aadhar Kendra
Joined October 2013
1.9K Following 46K Followers 22K Posts

Latest posts 5

Dr Neelam Latika Diwakar Gorhe Verified account @neelamgorhe
एकनाथ शिंदे यांच्या भक्तिरसानं पंढरी बदलुन गेली,
विठ्ठलभक्त सुखावले , हरीच्या रंगात हरवले शिंद्साहेब ,
विठ्ठल भक्तीचा अवघा रंग एक झाला !
आषाढी व कार्तिकी एकादशी हे आपले , महाराष्ट्राचे लाखोलोकांचे आनंदवारीचे प्रतिक आहेत. श्रीविठ्ठल व पंढरपुरला ओसंडून येणारा हा माणसांचा महापुर प्रेमाने सांभाळून दरवर्षी पंढरपूर व महाराष्ट्रात अनेक ऊपक्रम राबविले जातात . शासनासमोरचे हे आव्हान आपली शासकिय यंत्रणा सांभाळते.यासाठी जिव्हाळा व शिस्त यांचा मेळ घालणारे नेते म्हणजे शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
@mieknathshinde .दरवर्षी मा.शिंदेसाहेब वारीच्या आधीच पंढरपुरला भेट देतात . पाणी. आरोग्य , कचरा , बससेवा, बसस्थानकावरील
सेवा, वारकर्यांना जेवण , रस्ते अशा अनेक विषयांचा पाठपुरावा करतात . शासनाने केलेल्या आर्थिक तरतुदींची व्यवस्था झाली की नाही ते पाहतात . दि.१९ नोव्हेंबर , दि. २० नोव्हेंबर २६ रोजी मा. शिंदेसाहेब वारकरी व कार्यकर्ते यांच्यात मिसळून जाऊन अगदी समरस झालेले दिसत आहेत . जनतेतील जनतेच्या मध्ये हरवून जाणे म्हणजेच ‘अवघा रंग एक झाला ,अशे म्हणावेसे वाटते
@narendramodi
@AmitShah
@DrSEShinde
@shivsenaofc
@SakalMediaNews
@mataonline
@pudharionline
@fpjindia
@navshaktiweb
@htTweets
@ShittalKardekar
@lokmat
@LoksattaLive
@TV9Marathi
@ABPNews
@abpmajhatv
@zee24taasnews
@jaimaharashtran
@LokshahiMarathi
@saamTVnews
@ddsahyadrinews
@ANI
@ians_india
@UNESCO
1:10
Dr Neelam Latika Diwakar Gorhe Verified account @neelamgorhe
सन्मान मागायचा नसतो, कामातून मिळवायचा असतो : डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १८ नोव्हेंबर : शिवसेनेच्या उपनेत्या सौ. कला प्रदीप शिंदे यांची शिवसेना चर्मकार समाज विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते बाळासाहेब भवन येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “राजकारणात सन्मान मागायचा नसतो, तो कामातून मिळवायचा असतो. कला शिंदे यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास आहे. समाजाशी जोडलेले काम मनापासून केले, तर त्यातून मिळणारे समाधान मोठे असते.”

महिलांनी राजकीय आणि सामाजिक काम करताना एकमेकींना साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. “काम करताना टीका किंवा अपमान मनाला लावून घेण्यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. चर्मकार समाजाच्या विकासासाठी काम करताना महिलांचे नेतृत्व, बचत गट आणि प्रशिक्षणाच्या संधी यांनाही पुढे नेण्याचा प्रयत्न व्हावा,” असे त्या म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा आणि कार्याचा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करत डॉ. गोऱ्हे यांनी सकारात्मकतेने आणि एकजुटीने काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

सत्काराला उत्तर देताना सौ. कला शिंदे यांनी समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा आणि चर्मकार समाजासह महिलांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. “माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन. समाज आणि पक्षाला एकत्र आणण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करेन,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाला शिवसेनेच्या उप-महापौर संजय घाडी, उपनेत्या संध्या वढावकर, शिल्पा देशमुख, सुवर्णा करंजे, संजना घाडी, आंनद जाधव, राष्ट्रीय समन्वयक दिनेश शिंदे, वरळी नगरसेवक वनिता नरवणकर , विभाग प्रमुख शालिनी सुर्वे, नीलम पवार, राजश्री मांडविलकर, युवा सेना कार्यकर्ते रुची वाडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते.
@mieknathshinde
@DrSEShinde
@Shivsenaofc
@SakalMediaNews
@mataonline
@kala_shinde
@priyysakhi
@TV9Marathi
@jaimaharashtran
@abpmajhatv
@zee24taasnews
@navshaktiweb
@fpjindia
@SudarshanNewsTV
@sudhanshur2025
@lokmat
@uniindianews
@ANI
@ians_india
@PTI_News
@ddsahyadrinews
@airnewsalerts
@samant_uday
@shambhurajdesai
@PratapSarnaik
@mpprataprao
@iprakashabitkar
3 replies 4 reposts 15 likes 1.6K views View on X
Dr Neelam Latika Diwakar Gorhe Verified account @neelamgorhe
बाळासाहेबांच्या निधनाचा तो दिवस आजही डोळ्यांसमोर, १४व्या स्मृतिदिनी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जागवल्या आठवणी

बाळासाहेब ठाकरे यांच्या १४व्या स्मृतिदिनी पुण्यात अभिवादन, शिवसैनिकांसाठी प्रशिक्षण केंद्राचा संकल्प

पुणे, १७ नोव्हेंबर २०२६ | हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १४व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सारसबाग येथील बाळासाहेब ठाकरे कलादालनातील त्यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवसेनेच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात, बाळासाहेब भवन येथेही डॉ. गोऱ्हे आणि पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी पुण्यात शिवसैनिकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा संकल्प डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

बाळासाहेबांच्या निधनाचा दिवस आजही डोळ्यांसमोर उभा राहतो. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता आणि त्यांच्या अंत्ययात्रेला प्रचंड जनसमुदाय लोटला होता, अशी आठवण डॉ. गोऱ्हे यांनी सांगितली. बाळासाहेबांचे पुण्यावर विशेष प्रेम होते. अलका टॉकीज परिसरात त्यांच्या अनेक सभा झाल्या. त्यांची भेट झाली की ते पुण्यात काय चालले आहे, याची आवर्जून चौकशी करत आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यातील वास्तव्याच्या आठवणी सांगत, असेही त्या म्हणाल्या.

बाळासाहेबांचा हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचा विचार शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे नेत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी अयोध्येतील राममंदिराची उभारणी, कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय, श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न आणि समान नागरी कायद्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही डॉ. गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार @Shivsenaofc मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री ना.@mieknathshinde यांच्या नेतृत्वाखाली मदतकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” या शिंदे यांच्या आश्वासनानुसार शिवसैनिकांनी विविध भागांत मदत पोहोचवली, असे त्या म्हणाल्या.

पुणे शहरातील संघटनात्मक कामाला गती देण्यासाठी शिवसेनेचे संपर्क नेते उदय सामंत लवकरच पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शहरातील काही संघटनात्मक नियुक्त्यांसाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

यावेळी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख @bhangire_pramod संपर्कप्रमुख पूजा रावेतकर , सहसंपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, सुधीर कुरुमकर, महेंद्र जोशी, नितीन पवार, मीरा तुपेरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
@DrSEShinde
@SakalMediaNews
@mataonline
@LoksattaLive
@lokmat
@punekarnews
@PuneriSpeaks
@abpmajhatv
@zee24taasnews
@TV9Marathi
@jaimaharashtran
@LokshahiMarathi
@ddsahyadrinews
@airnewsalerts
@ANI
@ians_india
@milinddeora
@samant_uday
@PRavetkar
@brizpatil
@PrashantAherMT
@vinodraut
@MarathiRT
@SudarshanNewsTV
@sudhanshur2025
@iYogeshRKadam
@BharatGogawale
@meNeeleshNRane
@navshaktiweb
@pudharionline
Dr Neelam Latika Diwakar Gorhe Verified account @neelamgorhe
धानाचे पीक संकटात, वाघांच्या दहशतीने शेतकरी हैराण; थेट बांधावर जाऊन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाणून घेतल्या व्यथा!

नवरगाव, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथे पिकांची पाहणी, गावात थांबून महिलांशी संवाद; वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार

वनमंत्र्यांनी इतरांच्या कामात नाक खुपसण्यापेक्षा स्वतःच्या खात्याकडे लक्ष द्यावे : डॉ. नीलम गोऱ्हे यांचा निशाणा

शेतकरी व ऐतिहासिक मथुरा बलात्कार प्रकरणातील पीडित भगिनीसोबत दिवाळी साजरी; मुलाच्या नोकरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेकडून ५०० मदत संचांचे वाटप

चंद्रपूर, दि. ११ नोव्हेंबर २०२६ : चंद्रपूर जिल्ह्यात धानाचे पीक वाया जाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, दुसरीकडे वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि शेतमजूर भयभीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धानाच्या पिकांची पाहणी केली,

उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते @mieknathshinde आणि खासदार @DrSEShinde यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार हा दौरा केल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
धानाचा बोनस रखडला,सौरऊर्जेचा पुरवठा दुपारी चारपर्यंतच
शेतकऱ्यांनी धानाच्या पिकांच्या नुकसानीसह विविध प्रश्नांकडे डॉ. गोऱ्हे यांचे लक्ष वेधले. सौरऊर्जेच्या माध्यमातून शेतीसाठी मिळणारा वीजपुरवठा दुपारी चार वाजेपर्यंतच उपलब्ध होत असल्याने सिंचनात अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच धानाचा बोनस आणि एकरकमी मदतीचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे निवेदनाद्वारे मांडण्यात आले.

शेतकऱ्यांच्या या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर ठोस निर्णय होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे डॉ.गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

वाघांच्या भीतीने महिलांचे जगणे कठीण; वनमंत्र्यांवर टीका

गावातील महिलांशी संवाद साधताना वाघांच्या हल्ल्यांच्या भीतीमुळे शेतीकामासाठी बाहेर पडणेही धोकादायक बनल्याच्या व्यथा महिलांनी मांडल्या. वनविभागाच्या स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबतही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. वाघांच्या दहशतीमुळे शेतकरी आणि महिला भयभीत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे," असे स्पष्ट केले.

ऐतिहासिक मथुरा बलात्कार प्रकरणातील पीडित भगिनीसोबत दिवाळी; पुनर्वसनाचा आढावा

देशातील बलात्कारविषयक कायद्यात ऐतिहासिक बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरलेल्या १९७२ च्या 'मथुरा बलात्कार प्रकरणा'तील पीडित भगिनीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली.सर्वोच्च न्यायमूर्ती भूषण गवई यांनी या प्रकरणातील पीडितेच्या परिस्थितीकडे लक्ष वेधल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी डिसेंबर २५ मध्येही त्यांची भेट घेतली होती.

यावेळी पीडित भगिनीच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या घरी शेतकऱ्यांसोबत भोजन केले.प्रधानमंत्री आवास योजनेतून घर उपलब्ध करून दिल्याबद्दल शासन व जिल्हा प्रशासनाचे तसेच पुनर्वसनासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रसारमाध्यमांचे कौतुक केले.

कुटुंबातील मुलाच्या प्रलंबित नोकरीच्या प्रश्नाबाबत चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.पुढील आठवड्यात शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे व अन्य पदाधिकारी कुटुंबाची भेट घेऊन आवश्यक मदत करणार आहेत.पीडित महिलेची ओळख गोपनीय ठेवण्याच्या कायदेशीर तरतुदींचा आदर राखून या प्रकरणासाठी प्रचलित असलेल्या 'मथुरा' या नावाचाच उल्लेख करण्यात आला आहे.

भूमिहीन शेतमजुरांच्या रोजगारासाठीही पुढाकार

या दौऱ्यात भूमिहीन शेतमजुरांनी डॉ.गोऱ्हे यांची भेट घेऊन रोजगाराच्या समस्या मांडल्या. रोजगार हमीअंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कामांची यादी सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मागण्यांचाही संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

दिवाळीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने नवरगाव परिसरात ५०० मदत संचांचे वाटप करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हीच शिवसेनेची भूमिका
या दौऱ्याच्या यशस्वी नियोजनासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे,अजय स्वामी, संपर्कप्रमुख वर्षा मोरे,सुनीता मोरे, जिल्हाप्रमुख मीनल आत्राम,भारती राखडे, गोमती पाचभाई, संगीता राऊत, जालिंदर गायकवाड आणि नेताजी गहाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra
@MahaDGIPR
@ANI
2 replies 5 reposts 11 likes 432 views View on X
Dr Neelam Latika Diwakar Gorhe Verified account @neelamgorhe
*We will work to secure a permanent venue for the weapons exhibition; MLC & shivsena leader Neelam Gorhe*

*Over 250 historical weapons at the exhibition of Shivaji-era weapons*

Pune: We read and hear about weapons, but rarely get to see them in person.The history of Chhatrapati Shivaji Maharaj and his Mavala warriors is inspiring, and these weapons, famed for their valour, also give us strength. Speaking at the Shiv Sena under leadership of Mr. Eknath shinde and Shiv Kamgar Sena weapons exhibition in Pune during Diwali,MLC Neelam Gorhe said it was a celebration of bravery for the people of Pune.She said she would work to secure a permanent venue for such rare weapons exhibitions through the municipal corporation. Gorhe also noted that the exhibition would be held in the grounds of the Mumbai Mantralaya in the coming days.

To introduce the people of Pune, including school students, to Shivaji-era history and its tradition of valour during the Diwali holidays,Shiv Kamgar Sena has organised a grand exhibition of Shivaji-era weapons at the late Balasaheb Thackeray Art Gallery in Sarasbaug, Pune . Dr Neelam Gorhe visited the exhibition today, Monday. She was speaking on this occasion. She honoured Ishanvi Kumari Raut,who recently won a gold medal in national weightlifting, Hemant Tirale, who preserves weapons, Mahesh Parashivnikar of Shivgarjana Akhada, and stick-fighting athlete Kavya Jagdale.

At this exhibition by Shivgarjana Mardani Akhada,the people of Pune will have the opportunity to see over 250 different types of historical weapons, including spears, cannons, swords,tiger claws, armour, daggers, sangs, shields, gunpowder pouches, dandpattas, shamshirs and bichwas. The exhibition will be open to everyone free of charge every day from 10 am to 10 pm until November 11. Organiser Sudhir Kurumkar appealed to citizens and school students to make a point of visiting the exhibition.

To mark Diwali, Shiv Kamgar Sena has organised various social and cultural events for the people of Pune from November 5 to 11.These events are being held the Balasaheb Thackeray Art Gallery in Sarasbaug, pune on the initiative of Shiv Kamgar Sena state president Sudhir Kurumkar.

Tomorrow, on Diwali Padwa, a festival of 1,008 lamps will be held in the grounds of the Mahalakshmi Temple in Sarasbaug on behalf of @Shivsenaofc

#drneelamgorhe #whivsena #maharashtra #महालक्ष्मी_मंदिर
@narendramodi @AmitShah @rajnathsingh @MinOfCultureGoI
@Dev_Fadnavis @mieknathshinde @ShelarAshish @DrSEShinde @adgpi @rajnathsingh @PIB_India @TimesNow @UNESCO